आमच्या विषयी ...

तारकर्ली पर्यटन विकास संस्था.  (TTDS).

ही वायरी भूतनाथ, तारकर्ली, देवबाग येथील स्थानिक पर्यटन व्यावसायिकांची एकमेव कार्यरत संघटना आहे.
वर्ष 2000 सालात जेव्हा पर्यटन बहरू लागले तेव्हा त्यावेळचे 13 छोटे मोठे स्थानिक पर्यटन व्यावसायिक एकत्र येऊन संघटना स्थापन केली आज संघटनेत 200 च्या वर सदस्य आहेत. TTDS ने स्थापन झाल्यापासून पर्यटनात्मक विषयावर ट्रैनिंग सेमिनार, अभ्यासदौरे, कार्यशाळा व मीटिंग घेतल्या ज्याने स्थानिकांना त्याचा त्यांच्या विकासासाठी फायदा झाला. पर्यटनाला घातक ठरणाऱ्या विषयावर TTDS ने नेहमीच आवाज उठवला. पर्यटनात्मक विकासासाठी शासनाने बनवलेल्या नियमानां अजून पूरक व पोषक बनवण्यासाठी TTDS ने शासनस्तरावर नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला आहे . पर्यटन विकास,व्यक्ती विकास,सामाजिक विकास, स्वच्छता राखणे , NO प्लास्टिक झोन होणे व तत्सम्बधी कार्य करणे हे संघटनेचे मुख्य उद्देश आहेत.
शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय वायरी, तारकर्ली, देवबाग येथील पर्यटन व्यावसायिक आज स्वतःबळावर पर्यटनात्मक सेवा देत आहेत.
आज TTDS चं नाव मालवण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

Scroll to Top